Posts

गोगलगाय शेतामध्ये कशी नुकसान करते...?

Image
 मागील दोन वर्षापासून महाराष्ट्रात मराठवाड्यातील लातूर बीड आणि धाराशिव जिल्ह्यात बऱ्याच भागात शंखि गुगल कायमचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आला आहे सोयाबीन कापूस यासारख्या पिकांमध्ये रोगाव असते तर गोगलगायींचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे पिकांचे जास्त नुकसान होऊ लागले आहे. या गोगलगाईंचा प्रादुर्भाव नेमका कशामुळे वाढतोय आणि या गोगलगायींचा जीवनक्रम आणि त्या पिकांचा नुकसान कशाप्रकारे करतात याविषयी माहिती आपण पुढे पाहणार आहोत. सतत ढगाळ वातावरण गोगलगायींसाठी पूरक असल्यामुळे त्यांचं प्रजनन जलद होते, त्यामुळे त्यांची संख्या जलद पटीने वाढते, गेल्या दोन वर्षात पावसाचा कालावधी वाढल्याने गूगल गाईंची पुढील पिढी ही सक्रिय झाली आहे. काही भागात खरीप पिकांच्या पेरणी अंतर्गत पाऊस पडला त्यामुळे गुगल काहींच्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. एक गोगलगाय सुमारे एका वर्षात दोनशे अंडी देतात, ही अंडी देण्याची क्षमता जास्तीत जास्त 500 पर्यंत जाते, त्यांच्या अंड्यांचा आकार हा साबुदाण्यासारखा असतो,  प्रतिकूल वातावरणात या गुगल काय जमिनीत तीन वर्षापर्यंत  सुस्त राहू शकतात...

अमेरिकेतील गाईंच्या पोटाला छेद का केले जाते...?

Image
आज मी तुम्हाला खूपच एक अजब गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे अमेरिका आणि इतर काही देशात तुम्ही पाहिलं असेल की गाई आणि म्हशींच्या पोटाला छिद्र पडतात, एवढी मोठी जोखीम घेऊन ते लोक गायीच्या पोटाला छेद का करत असतील चला तर आपण पाहूया, मला माहित असेल की तिला चार गाईला चार पोट असतात ते छिद्र पहिल्या पोटाला केलं जातं, वैज्ञानिकांचा असं मत आहे की त्यांची पचनक्रिया तपासण्यासाठी संशोधन करण्यासाठी पोटाची साफसफाई करण्यासाठी आणि इतर गाईंचे अवयव दुसऱ्या गाईंना बसवण्यासाठी हे छिद्र केलेले जातात, नुसत्या गायीच्या पोटात जे जिवाणू आहेत त्या जिवाणूंचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या पोटामध्ये गाई आजारी असेल तर डायरेक्ट औषध सोडण्यासाठी त्या छिद्रा चा वापर केला जातो, ही प्रथा आज तिथे चालू झाली नसून परंपरागत ती खूप जुनी आहे, तेथील वैज्ञानिक सांगतात की ह्या प्रकारामुळे गाई वरती बारीक लक्ष ठेवता येते व यामुळे गाईंच्या आयुष्य वाढते, यावरती तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट मध्ये कळवा.

Goat Rearing : करडांची मरतूक टाळण्यासाठी काय कराल?

Image
 शेळीपालनामध्ये शेळ्यांचे उत्तम आरोग्य, निरोगी करडांची उत्पत्ती व शेळ्यांची विक्री करण्याच्या वयापर्यंतची निगा याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कमी गुंतवणूकीत जास्त फायदा देणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन (Goat Rearing ). त्यामुळे बरेचसे तरुण शेळीपालन व्यवसायाकडे वळत आहेत.  शेळीपालनामध्ये शेळ्यांचे उत्तम आरोग्य, निरोगी करडांची (Goat Kids) उत्पत्ती व शेळ्यांची विक्री करण्याच्या वयापर्यंतची निगा याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.  याची सुरवात शेळी ज्या दिवशी गाभण राहते, त्या दिवसापासून सुरू होते. मात्र शेळी विल्यानंतर करडांची जास्त प्रमाणात मरतूक होते.  करडांची व शेळीची मरतूक कमी करण्यासाठी शेळीची गर्भधारणेअगोदर ते करडू जन्मल्यापर्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळेच सुदृढ आणि निरोगी करडे जन्माला येतील. यासाठी काटेकोर व्यवस्थापनाची गरज आहे.  मथुरा येथील केंद्रीय शेळी संशोधन संस्थेचे (सीआयआरजी) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. के. सिंह यांच्या मतानूसार करडांची मरतूक ही शेळीपालनातील अत्यंत महत्वाची समस्या आहे. करडांची मरतूक झाल्यामुळे शेळीपालकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लाग...

जनावर गाभण न राहण्याच्या समस्येवर घरगुती उपचार

Image
दुधाळ गायी-म्हशींमध्ये वारंवार उलटण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. गायी, (Cow) म्हशींमध्ये तीनदा योग्य वेळी रेतन केल्यानंतरही जर जनावर गाभण राहत नसेल, तर यास वारंवार उलटणे / असे म्हणतात. गायी म्हशीमध्ये माजाचे चक्र दर २१ दिवसांनी येत असते. जिथे जास्त दूध उत्पादन, तिथे वारंवार उलटण्याचे प्रमाण जास्त दिसून आलेले आहे. त्यामुळे दुधाळ गायी- म्हशींमध्ये वारंवार उलटण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. वारंवार उलटण्याची अनेक कारणे आहेत परंतु फलनातील दोष आणि भ्रूण दोष ही मुख्य कारणे आहेत. रेतन केल्यानंतर फलनाची क्रिया योग्य झालेली असल्यास, २१ दिवसांनी पुन्हा माज दिसून येत नाही. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने (NDDB) जनावर गाभण नराहण्याच्या समस्येवर नैसर्गिक घरगुती उपचारांची शिफारस केली आहे. खाली दिलेले पदार्थ क्रमवार दिवसातून एकदा गुळ आणि मिठासोबत खाऊ घालावे.  - एक मुळा दररोज पाच दिवस  - कोरफडीचे एक पान दररोज असे चार दिवस  - चार मुळी हडजोड चार दिवस  - चार मुठी कडीपत्ता व हळद चार दिवस  लक्षात ठेवा हा उपचार माजाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या  दिवसापासून करावा...

दर्जेदार काळी मिरीचे उत्पादन तंत्र (Black paper)

Image
 मिरी लागवड स्वतंत्रपणे, नारळ व सुपारीच्या बागेत मिश्रपीक तसेच परसबागेत करता येते. कोकणातील हवामानात पन्न्यूर- १ ही संकरित जात चांगले उत्पादन देते. या जातीचे गर लांब आणि मिरी दाणे भरगच्च असतात.  काळी मिरी वेलाच्या उत्तम वाढीसाठी सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि १६ ते ३८ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. कोकणातील हवामान काळी मिरीच्या लागवडीसाठी अत्यंत पोषक आहे. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन मिरी लागवडीसाठी निवडावी. अति विम्ल किंवा आम्लयुक्त जमीन निवडू नयेत. ज्या जमिनीत पावसाळ्यात पाणी वारंवार साचते अशा जमिनी निवडू नयेत. कोकणातील हवामानात पन्न्यूर -१ ही संकरित जात चांगले उत्पादन देते. या जातीचे लोंगर लांब आणि मिरी दाणे भरगच्च असतात. लागवड तंत्र  लागवड स्वतंत्रपणे, नारळ व सुपारीच्या बागेत मिश्रपीक म्हणून, तसेच परसबागेत करता येते.  स्वतंत्र मिरीच्या लागवडीसाठी ३ मी बाय ३ मी अंतरावर बिनकाटेरी पांगारा, सिल्वर ओक, भेंड किंवा मँजियम इत्यादी झाडांची मिरी लागवडीपूर्वी किमान ६ ते १० महिने आधी लागवड करावी.  नारळ व सुपारी बागेत मिरी लागवडीसाठी नारळामध्ये ७.५ मी....

काळी मिरी कशी तयार करतात ? How to prepare black pepper?

Image
 काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर किफायतशीर उत्पादन सुरू होते. साधारणपणे मे-जून महिन्यात मिरीला तुरे येतात आणि जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घड काढणीस तयार होतात.  हिरव्या घडातील एक-दोन दाण्यांचा रंग पिवळा अगर नारिंगी होताच घड तोडावेत, नंतर त्या घडातील मिरीचे दाणे हातांनी वेगळे करावेत किंवा तयार केलेल्या जमिनीवर घडांचे ढीग उन्हात वाळवावेत. ही पद्धत मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी घड तयार झाले तरच वापरतात.  हिरव्या मिरीपासून काळी मिरी तयार करण्यासाठी दाणे बांबूच्या करंडीत गोळा करावेत किंवा पातळ फडक्यात गुंडाळावेत. त्यानंतर एका स्वतंत्र भांड्यात पाणी उकळत ठेवावे. पाण्याला उकळी येण्यास सुरवात झाल्यानंतर ती करंडी अगर फडक्यात गुंडाळलेली मिरी त्या उकळत्या पाण्यात सुमारे एक मिनिट बुडवून काढावी. अशारीतीने उकळत्या पाण्यातून बुडवून काढलेली मिरी उन्हामध्ये चटई अगर स्वच्छ फडके अंथरून त्यावर वाळत ठेवावी. या पद्धतीचे फायदे म्हणजे दाणे दोन ते तीन दिवसांत वाळतात. दाण्यांना आकर्षक काळा रंग येतो. बुरशी लागत नाही. मिरीची प्रत सुधारते.  संपर्क :०२३५८ - २८२४१५, २८२...

Nano DAP Fertilizer : शेतीचा उत्पादन खर्च होणार कमी; केंद्र सरकारने नॅनो डीएपी खत केले लाँच.

Image
 Nano DAP Fertilizer नॅनो युरियानंतर (Nano Urea) इफ्फ्कोने आता नॅनो डीएपी (द्रवरूप खत विकसित केले आहे. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह ( Amit Shah) यांच्या हस्ते बुधवारी (ता. २६) इफ्फ्कोच्या नॅनो डीएपी खताचे लोकार्पण करण्यात आले. ५०० मिली द्रवरुपातील डीएपीमुळे पारंपरिक ५० किलोच्या गोणीपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नॅनो युरिया व डीएपीचा वापर करण्याचे आवाहन शाह यांनी शेतकऱ्यांना केले. तसेच खते हा शेतीचा अविभाज्य भाग आहे.  नॅनो डीएपीमुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही वाढविण्यासह जमिनीचे संवर्धन होईल. तसेच जमिनीची सुपिकता कायम राहण्यास मदत होईल, असे अमित शाह यावेळी म्हणाले.  ६०० रुपयांत मिळणार नॅनो डीएपी  नॅनो डीएपीची ५०० मिलीची एक बाटली ५० किलोच्या पारंपरिक दाणेदार डीएपी खताच्या समतुल्य आहे. पारंपरिक दाणेदार डीएपीच्या एका गोणीसाठी शेतकऱ्यांना १३५० रुपये मोजावे लागतात. मात्र, नॅनो डीएपीची किंमत केवळ ६०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून शेतीच...