गोष्ट लालबागच्या राजाची

 आजच्या आर्टिकल मध्ये आपण लालबागच्या राजाची कथा सांगणार आहोत.

लालबागचा राजा हा महाराष्ट्रातील मुंबईतील सार्वजनिक गणपती आहे. हा गणपती नवसाला पावतो.


लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली . सध्या अस्तित्वात असलेले बाजार येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता.

 त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. 

त्यावेळचे शामराव विष्णू बोधे, नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. 


त्यामुळे इ.स. १९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रूपात `श्री'ची स्थापना झाली. येथूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली.

कोळी समाजाच्या नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती सर्वप्रथम प्रसिद्ध झाला.

इ.स. १९५८ सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांची रीघ वाढत चालली. उत्सवाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. इ.स. १९४८ ते इ.स. १९६८ या काळात मंडळाने काही चांगल्या प्रथा निर्माण केल्या. 

श्री सत्यनारायणाची महापूजा व त्याच दिवशी रात्रौ पानसुपारी समारंभ ही त्यापैकी एक. या समारंभात समविचारी संस्था व विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच मंडळास मदत करण्यात तत्पर असलेल्या व्यक्तिंचा आदर सत्कार करण्यात येतो. ही प्रथा आजतागायात चालू आहे. 

तसेच दर्शनोत्सुक भाविकांची व्यवस्था करण्यासाठी विविध मंडळाची जागरण पद्धत सुरू केली. त्याच कालावधीत विभागातील गणेशोत्सव मंडळाबरोबरच कुंभारवाडा, दुर्गादेवी, डंकनरोड, नवी अमृतवाडी, कामाठीपुरा, खेतवाडी या गणेशोत्सव मंडळांशी देखील जिव्हाळयाचे संबंध प्रस्थापित केले ते पुढे दृढ होत गेले व यापुढे आणखी दृढ होत जातील याबद्दल शंका नाही.


मंडळातर्फे व्याख्याने आयोजित केली जातात. ग्रंथालय उपक्रम राबविला जातो.तसेच नेत्र शिबिर,रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर यांसारखी शिबिरे आयोजित केली आहेत.

 भारत पाकिस्तान कारगिल युद्धाच्या वेळी सीमेवर लढणाऱया भारतीय सैनिकांच्या मदतीसाठी `आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंडा'करिता रु. १ लाखाचा धनादेश महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांचेकडे सुपूर्द केला.

लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बँड, लेझिम व ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट येथून निघते.

 मिरवणूक लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग (कुंभारवाडा), सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी. टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा मार्गाने गिरगाव चौपाटी येथे पोहोचते.


Comments

Popular posts from this blog

Crop Protection :- आता मोकाट प्राणी शेतात शिरताच मोबाईलवर येईल एसएमएस

जनावर गाभण न राहण्याच्या समस्येवर घरगुती उपचार

Birsa Munda Krushi Kranti Yojana : बिरसा मुंडा योजनेतून मिळवा विहिरीसाठी अनुदान ; काय आहे योजनेसाठी पात्रता

Nano DAP Fertilizer : शेतीचा उत्पादन खर्च होणार कमी; केंद्र सरकारने नॅनो डीएपी खत केले लाँच.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना :- Annasaheb Patil

दर्जेदार काळी मिरीचे उत्पादन तंत्र (Black paper)

अमेरिकेतील गाईंच्या पोटाला छेद का केले जाते...?

Farmer Accident Insurance Schemes: शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत

कबूतरा मुळे 6 महिन्यात मरणाच्या दारात... उपाय... ?