केळी खोडापासून धागे निर्मिती यंत्र. केळी धाग्यापासून कापड, पेपर निर्मिती

आपन ह्या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत, केळी खोडापासून धागे निर्मिती यंत्र , पेपर निर्मिती यंत्र.

केळी घड काढणीनंतर झाडाचे मोठ्या प्रमाणात अवशेष शिल्लक राहतात. केळी खोडापासून धागे निर्मिती करता येते. या धाग्यांचा वापर कागद निर्मिती, ऊर्जा निर्मिती, धागे निर्मिती तसेच जैवप्लास्टिक निर्मितीमध्ये करता येतो.

केळीच्या खोडापासून चांगल्या प्रकारे धाम्यांची "निर्मिती करता येते. केळी खोडापासून धागे तयार करण्यासाठी विविध पद्धती वापरतात. यामध्ये प्रामुख्याने खोड सडवणे, रासायनिक प्रक्रियेचा अवलंब तसेच यंत्राचा वापर करून धागे काढता येतात. खोड सडवून धागा काढणे आणि रासायनिक प्रक्रिया पद्धत वेळखाऊ आहे. यामध्ये उत्पादनाची गुणवत्ता फारशी चांगली राहात नाही. त्यापेक्षा धागे काढण्यासाठी यंत्राचा वापर केल्याने वेळ आणि खर्च वाचतो. 

धाग्याची गुणवत्ता, रंग आणि लांबी चांगली मिळते. केळीच्या खोडापासून तयार केलेले घाग्यांचा वापर पारंपारिक हस्तकला आणि कापड तयार करण्यासाठी केला जातो. राष्ट्रीय नैसर्गिक भागे। अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने केळी खोडापासून धागा निर्मितीचे यंत्र विकसित केले आहे.

कापड निर्मिती

केळीच्या धाग्यापासून कापड निर्मिती केली जाते. त्यासाठी संशोधन संस्थेने तंत्रज्ञान विकसित केले आहे. केळी घाण्यापासून तयार केलेल्या कापडाची गुणवत्ता ही कापसापासून तयार केलेल्या कापडाइतकीच असते. केळी धाग्यापासून बनवलेल्या कापडाची लवचिक आणि कडकपणा थोडा जास्त असतो, परंतु सॉफ्टनर फिनिशिंग तंत्रज्ञानाचा वापर करून हा कडकपणा कमी करता येतो.

धाग्यांचा उपयोग

केळी खोडापासून तयार केलेल्या धाग्यांचा वापर हस्तकला वस्तू, पिशव्या, उच्च-गुणवत्तेचे कापड, दोरी, पॉलिमर मॅट्रिक्समध्ये मजबुतीकरण साहित्य, बांधकाम साहित्य, माशांचे जाळे, कागदी पुठ्ठा, उशा, कुशन, गाद्या, पिशव्या, पाय पुसणी, योगा चटई, पडदे निर्मितीसाठी केला जातो.

बिस्कीट निर्मिती

● केळी खोडाच्या गाभ्याचा वापर करून त्यापासून पावडर निर्मितीचे तंत्र विकसित संशोधन संस्थेने विकसित आहे. या पावडरपासून बिस्किटांची निर्मिती करता येते. केळी खोडाची साल काढून आतील गाभ्याचे बारीक तुकडे करावेत. हे तुकडे ड्रायरमध्ये ७० अंश सेल्सिअस तापमानामध्ये वाळवावेत. त्याची पावडर तयार करावी.

• विस्किटे तयार करण्यासाठी केळी गाभ्याची पावडर, मैदा, साखर आणि लोणी यांचा वापर केला जातो. बिस्कीट तयार करण्यासाठी मैदा पिठीसाखर सोबत चाळून ते चांगले मिसळावे. खोडाच्या गाभ्याची पावडर, लोणी आणि बेकिंग पावडर यांचे मिश्रण तयार करावे. या मिश्रणापासून योग्य आकाराची बिस्किटे तयार करावीत, बिस्किटे ओव्हनमध्ये ठेवावीत. त्यानंतर थंड करावीत.

पेपर आणि पेपर बोर्ड निर्मिती

• केळीचे खोड हे सेल्युलोजचा (४० ते ४५ टक्के) चांगला स्रोत आहे. योग्य प्रक्रियाकरून केळीच्या विविध भागांचा वापर क्राफ्ट पेपर तयार करण्यासाठी करतात.

● केळीच्या टाकाऊ गोष्टीपासून बनवलेला कागद आणि पेपरबोर्डची ताकद चांगली आहे. घर्षण प्रतिरोधक, ओलावा प्रतिरोधक आहे.

● कागद आणि पेपरबोर्डचा टिकाऊपणा, मुद्रण क्षमता चांगली आहे.

● कागद आणि पेपरबोर्ड अन्न पॅकेजिंगमध्ये उपयुक्त ठरू शकतात. कागदाच्या बोर्डचा वापर हा व्हाइट बोर्ड, सॉलिड बोर्ड, फायबर बोर्ड आणि चीप बोर्ड तयार करण्यासाठी होतो.


manisha.jagadale.123@gmail.com (राष्ट्रीय नैसर्गिक धागे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान

संस्था, कोलकता)

Comments

Popular posts from this blog

Crop Protection :- आता मोकाट प्राणी शेतात शिरताच मोबाईलवर येईल एसएमएस

जनावर गाभण न राहण्याच्या समस्येवर घरगुती उपचार

Birsa Munda Krushi Kranti Yojana : बिरसा मुंडा योजनेतून मिळवा विहिरीसाठी अनुदान ; काय आहे योजनेसाठी पात्रता

Nano DAP Fertilizer : शेतीचा उत्पादन खर्च होणार कमी; केंद्र सरकारने नॅनो डीएपी खत केले लाँच.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना :- Annasaheb Patil

दर्जेदार काळी मिरीचे उत्पादन तंत्र (Black paper)

अमेरिकेतील गाईंच्या पोटाला छेद का केले जाते...?

Farmer Accident Insurance Schemes: शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत

कबूतरा मुळे 6 महिन्यात मरणाच्या दारात... उपाय... ?

गोष्ट लालबागच्या राजाची