शेतील मिळाली बरदाना निर्मितीची साथ

पतीचे अकाली निधन झाल्यानंतर दोन मुली आणि एका मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी प्रमिला भाऊराव चांदेवार यांच्यावर आली. प्रतिकूल परिस्थितीला न डगमगता प्रमिलाताईंनी शिवणी बांध (जि. भंडारा) येथील कुटुंबाची शेती सांभाळली. याचबरोबरीने बचत गटातील महिलांना सोबत घेऊन बारदाना निर्मिती उद्योगाची उभारणी केली आहे.

 चांदेवार कुटुंबीयांची शिवणी बांध (ता. साकोली, जि. भंडारा) शिवारात भात शेती आहे. चांदेवार यांनी तलावातून पाणी घेत तीन एकरांसाठी सिंचनाची सोय केली आहे. 

उर्वरित दोन एकर कोरडवाहू आहे. शेतीकाम करताना साप चावल्याने प्रमिला यांचे पती भाऊराव यांचे २००४ मध्ये निधन झाले. त्या वेळी निकिता आणि वैष्णवी या मुली आणि मुलगा सागर लहान होता. पतीच्या निधनानंतर प्रमिला यांनी संघर्ष करीत शेती आणि कुटुंबाची जबाबदारी पेलली. डिसेंबर १९९८ मध्ये प्रमिलाताई बचत गटामध्ये सहभागी झाल्या होत्या. याच गटाच्या माध्यमातून त्यांनी २००६ मध्ये कर्ज रककमेची उचल केली. यातून त्यांनी पशुपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. 

एक जर्सी गाय खरेदी केली. काही महिन्यांनी दुसऱ्या गाईची खरेदी केली. दररोज १८ ते २० लिटर दूध संकलित होऊ लागले. गावातील संकलन केंद्रामध्ये दूधपुरवठा करण्यावर त्यांनी भर दिला. यातून दररोज १५० ते २०० रुपये उत्पन्न मिळायचे. ५० रुपयांचा पशुखाद्यावरील खर्च अपेक्षित धरता उर्वरित १०० रुपयांत त्यांनी घरखर्च भागविला. तसेच भात विक्री करून मिळणारा पैसा खर्च न करता बचत केला..

 दरम्यानच्या काळात महिला आर्थिक विकास मंडळाने प्रमिलाताईंना जगण्याचे बळ दिले. १९९८ मध्ये गावामध्ये प्रमिलाताईंनी पुढाकार घेऊन रमाबाई महिला बचत गट उभारला. या गटात १६ महिला सदस्या आहेत. सुरुवातीला प्रति महिना २५ रुपये बचत सुरू झाली. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून प्रति महिना १०० रुपये बचतीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या माध्यमातून गटाची बचत दीड लाखावर पोहोचली आहे. अधिक रक्कमेची गरज असल्यास बँकेकडून कर्ज घेऊन गटातील सदस्यांना दिले जाते. याच रककमेच्या बळावर महिला सदस्यांनी कुटुंबाला सावरले


बारदानानिर्मिती व्यवसायाला सुरुवात

प्रमिलाताईंनी बाजारपेठेची गरज ओळखून दोन वर्षांपूर्वी बारदानानिर्मिती व्यवसायास सुरुवात केली. महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत सबला लोकसंचालित साधन केंद्रामार्फत हा प्रकल्प १०० टक्के अनुदानावर मिळाला. या उद्योगासाठी कटर यंत्र, सूत बंडल, चार शिलाई यंत्रे मिळाली. प्रमिलाताईंनी या व्यवसायाच्या बळावर स्वतःचे आर्थिक स्वावलंबन साधले, त्यासोबतच गावातील सहा महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. 

बारदाना मागणीच्या काळात हंगामात या उद्योगात बारापेक्षा अधिक महिलांना रोजगार दिला जातो. रोलवरील बारदाना तयार करणाऱ्या महिलांना दीड रुपया प्रति नग आणि सिमेंट पोत्यांपासून बारदाना तयार करणाऱ्या महिलांना प्रति नग दोन रुपये मजुरी दिली जाते. दिवसभरात या उद्योगामध्ये एक महिलेला सरासरी २०० रुपये मजुरी मिळते. हंगाम लक्षात घेऊन बारदाना तयार करण्यासाठी.बारदाना रोल २८ ते ३२ सेंमी रुंद आणि लांबी ४८ ते ५२ सेंमी लांब. मागणीनुसार एका बारदान्याची सरासरी लांबी ५२ सेंमी. आणि रुंदी २९ सेमी ठेवली जाते


बाजारातून नवा सूत रोल खरेदी करण्यासोबतच जुन्या सिमेंट पोत्यांचा देखील बारदाना तयार करण्यासाठी उपयोग केला.

भात शेती मध्ये सुधारणा

कुटुंबाच्या पाच एकर शेतीचे प्रमिलाताई चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता शेतीकामासाठी कायमस्वरूपी एक मजूर आहे. सिंचनाची सोय नसल्याने दोन एकरांत पावसाच्या पाण्यावर भात उत्पादन होते. रब्बी हंगामात हरभरा पीक घेतले जाते. उर्वरित तीन एकर क्षेत्र हे तलावानजीक असून, त्यातील पाण्याची उपलब्धता झाल्यास उन्हाळी भात लागवड होते. एकरी सरासरी १२ क्विंटल भात उत्पादन होते. भाताला सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतो

महिला आर्थिक विकास महामंडळाची साथ

महिला आर्थिक विकास महामंडळाने पूर्व विदर्भात दुर्गम आणि मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. 'माविम'च्या या उपक्रमांना इतर विभागांचे देखील सहकार्य मिळते. त्यामुळेच या भागात महिलांमध्ये उद्यमशीलता वाढीस लागली. 

मानव विकास योजनेतून बारदाना निर्मिती उद्योगाला प्रोत्साहन देण्यात आले. धान्य साठवणुकीसाठी बारदान्याची मागणी आहे. त्यामुळे या उद्योगातून शेतकऱ्यांची गरज यातून पूर्ण होते, तसेच महिलांना रोजगार मिळाला आहे. अशी माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी दिली


मुलांना केले उच्चशिक्षित


मुले उच्चशिक्षित व्हावीत याच उद्देशाने प्रमिलाताईंनी ध्येय निश्चित केले. मोठी मुलगी निकिता एमएस्सी झाली असून, तासिका पद्धतीवर शिक्षिका आहे. वैष्णवी वर्धा येथे फॅशन डिझाइनचे शिक्षण घेत आहे. मुलगा सागर याने अभ्यासात सातत्य ठेवत आईची स्वप्नपूर्ती केली, खरगपूर येथील आयआयटीमध्ये तो शिक्षण घेत आहे. प्रमिलाताईंच्या जिद्दी कहाणीची माहिती झाल्यानंतर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी त्यांची भेट घेऊन बचत गटाच्या उपक्रमांची माहिती घेतली.

८० किलो भात साठवता येईल अशा आकाराच्या बारदानाची निर्मिती


शोधली बाजारपेठ


प्रमिलाताई महिला समूहाच्या अध्यक्ष असल्याने तालुक्यातील ४३ गावांशी त्यांचा संपर्क आहे. विविध गावांतील बचत गटातील सदस्यांकडे बारदाना विक्रीसाठी ठेवला जातो. बारदान्याचा सरासरी २० रुपये आहे. बचत गटातील सदस्यांना विक्री केल्यानंतर प्रति बारदाना दोन रुपये मिळतात. प्रमिलाताईंना १८ रुपये प्रति बारदाना मिळकत होते. वर्षभरात सरासरी साठ हजार रुपयांची उलाढाल बारदाना विक्रीतून होत.


प्रमिला चदिवार ८८८८६२८९३६




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Crop Protection :- आता मोकाट प्राणी शेतात शिरताच मोबाईलवर येईल एसएमएस

जनावर गाभण न राहण्याच्या समस्येवर घरगुती उपचार

Birsa Munda Krushi Kranti Yojana : बिरसा मुंडा योजनेतून मिळवा विहिरीसाठी अनुदान ; काय आहे योजनेसाठी पात्रता

Nano DAP Fertilizer : शेतीचा उत्पादन खर्च होणार कमी; केंद्र सरकारने नॅनो डीएपी खत केले लाँच.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना :- Annasaheb Patil

दर्जेदार काळी मिरीचे उत्पादन तंत्र (Black paper)

अमेरिकेतील गाईंच्या पोटाला छेद का केले जाते...?

Farmer Accident Insurance Schemes: शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत

कबूतरा मुळे 6 महिन्यात मरणाच्या दारात... उपाय... ?

गोष्ट लालबागच्या राजाची