भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना वैशिष्ट्य

 वाचकांसाठी महत्वाची सूचना

आम्ही स्वाधार योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे,

अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून दिले जाते. 


त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात असे कोणी अनुसूचित जात व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थी असतील जे दुसऱ्या शहरात जाऊन स्वतःचे शिक्षण पूर्ण करत असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजने अंतर्गत अर्ज करून लाभ मिळवू शकतील.

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी निरंतर प्रयत्नात असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांची सुरुवात करत असते.


आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती। जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव स्वाधार योजना आहे.


राज्यातील विद्यार्थी इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी उत्सुक असतो परंतु काही ठिकाणी विद्यार्थी राहत असलेल्या ठिकाणी इयत्ता 10वी नंतर च्या शिक्षणाची सोय उपलब्ध नसते त्यामुळे विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यावर पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक


अभ्यासक्रमासाठी घरापासून दूर दुसऱ्या शहरात जावे लागते व त्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या शहरात वास्तव्य करावे लागते परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या व अपुरी शासकीय वसतिगृहे यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात राहण्याची सोय उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी जास्त पैसे देऊन स्वतःच्या राहण्याची सोप करावी लागते परंतु राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात व कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी स्वतःच्या राहण्याची सोय करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात जे त्यांना अशक्य असते या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होतो व विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून इयत्ता 11 वी व त्या पुढील शिक्षण तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो.


स्वाधार योजनेअंतर्गत स्वतःच्या घरापासून दूर दुसऱ्या शहरात शिक्षण पूर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून विद्यार्थी कोणत्याही आर्थिक अडचणी शिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व राज्याचा विकास करू शकतील. राज्यातील जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या गरीब असल्याकारणामुळे स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात त्यांच्यासाठी स्वाधार योजना एक फायद्याची ठरणार आहे कारण या योजने अंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व स्वतःचा सर्वागीण विकास करू.


दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या संख्येच्या प्रमाणात झालेली वाढ तसेच राज्यात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत आहेत. शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. 

अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10वी / 12वी/पदवी/पदवीका परिक्षेमध्ये 60% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50% असेल.


डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना उद्देश

swadhar yojana purpose


• राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील इयत्ता 11 वी, इयत्ता 12वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून देणे हा स्वाधार योजनेचा मुख्य उद्देश आहे.

• दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारणे 

• विद्यार्थ्यांचे सामाजिक व आर्थिक विकास करणे

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे

• स्वाधार योजने अंतर्गत अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल बनविणे

• विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे

• दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातीलविद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

swadhar yojna features


महाराष्ट्र शासनाद्वारे स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.


• समाज कल्याण विभागाद्वारे स्वाधार योजना राबविली जाते

• आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थी ज्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजना फायद्याची ठरणार आहे.

• राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली हि एक महत्वाची अशी एक योजना आहे.

• दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्याचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी हि योजना महत्वाची ठरणार आहे.

• स्वाधार योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून अर्ज करताना विद्यार्थ्यांना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागू नये.

• स्वाधार योजने अंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.


स्वाधार योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान


dr babasaheb ambedkar swadhar yojana anudan


या योजने अंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर (इयत्ता 11वी, पदवी, पदव्युत्तर पदवी) शिक्षण घेण्यासाठी शासकीय • वसतीगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे रक्कम संबंधीत विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल.

वरील रकमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5000/- रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2000/- रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी अतिरिक्त स्वरूपात देण्यात येईल.


स्वाधार योजनेचे लाभार्थी


babasaheb ambedkar swadhar yojana beneficiary


अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील दुसऱ्या शहरात इयत्ता 11 वी, इयत्ता 12वी, व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी


स्वाधार योजनेचा लाभ


• दुसऱ्या राज्यात इयत्ता 11वी, इयत्ता 12वी, व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक विषयाचे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता दिला जातो,

• स्वाधार योजने अंतर्गत अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल.

विद्यार्थ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल

• विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनतील

अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थी स्वाधार योजनेच्या सहाय्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.

• स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.

• या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची सुद्धा गरज भासणार नाही.

• राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.

• स्वाधार योजने अंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण व प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःचा एखादा व्यवसाय सुरु करू शकतील व राज्यातील बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकतील व राज्याचा आर्थिक विकास करू शकतील.

• राज्यातील बेरोजगारी कमी होईल.


स्वाधार योजनेसाठी आवश्यक पात्रता


swadhar yojana eligibility


• अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा


अर्जदार विद्यार्थी हा अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील असावा.


स्वाधार योजनेच्या अटी व शर्ती


• फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच स्वाधार योजनेचा

लाभ दिला जातील.

• महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. • स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी


विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा व त्याने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.


• विद्यार्थी स्थानिक नसावा. (विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा)


• इयत्ता 11 वी आणि इयत्ता 12वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वी मध्ये किमान 60% गुण असणे अनिवार्य असेल.


• इयत्ता 12 वी नंतरच्या दोन वर्षाकरीता जास्त कालावधी असलेल्या पदवीका किंवा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 12 वी मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिर्वाय आहे.


दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यता प्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान 60% गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/ CGPA चे गुण असणे आवश्यक राहील.


• इयत्ता 12वी नंतर पदवीका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा आणि 'पदवीनंतर पदव्युत्तर पदवी / पदवीका अभ्यासक्रमाचा कालवधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा.


• स्वाधार योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3% आरक्षण असेल दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा 50% इतकी राहील.


• अर्जदार विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. • विद्यार्थ्यांने राज्य शासन, अखिल भारतीय


तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकिय शिक्षण परिषद/वैद्यकिय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्रशिक्षण परिषद वा तत्सम सक्षम प्राधीकारी यांच्या मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालया मध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.


• अर्जदार विद्यार्थी हा दुसऱ्या शहरात स्वतःचे शिक्षण पूर्ण करत असावा.


• अर्जदार विद्यार्थी स्वतःच्या शहरात घराजवळ शिक्षण घेत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.


• विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल निवडलेला विद्यार्थी संबंधीत अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.


• अर्जदार विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत निर्वाह भत्ता योजनेचा लाभ मिळवत असल्यास अशा विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.


• विद्यार्थ्यांने स्वतःचा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत / शेड्युल्ड बँकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.


• विद्यार्थी सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असल्यास अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.


• विद्यार्थी इयत्ता 11 वी, इयत्ता 12वी आणि त्यानंतरचे 2 वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा.


• लाभार्थी विद्यार्थ्यांने मधीच स्वतःचे शिक्षण सोडल्यास अशा विद्यार्थ्यांना या योजनेमधून बाहेर केले जाईल


• प्रवेशित विद्यार्थ्यांस प्रत्येक सत्र परिक्षेचा निकालाची प्रत निकाल लागल्यापासून 15


दिवसांचे आत नेमून दिलेल्या कार्यालयात • सदर योजनेचा लाभ प्रवेशित अभ्यासक्रमांच्या कालावधीपर्यतच देय राहिल. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना एकुण शैक्षणिक कालावधीत जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत घेता येईल.


• विद्यार्थ्याने खोटी माहिती व कागदपत्रे देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण 'न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करित असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील तसेच त्यास दिलेल्या रकमेची 12 टक्के व्याजासह वसुली केली जाईल.


• या योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे अन्यथा तो या योजनेस अपात्र होईल.


स्वाधार योजना कागदपत्रे

• आधार कार्ड


• रेशन कार्ड


•रहिवाशी दाखला


• मागील वर्षातील गुणपत्रिका


• मोबाईल क्रमांक


ई-मेल आयडी


• पासपोर्ट साईज फोटो


• विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रमाणपत्र


बँक खात्याचा तपशील


• उत्पन्नाचा दाखला


. जातीचा दाखला


• जन्माचा दाखला


• शपथपत्र 


स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत


dr ambedkar swadhar yojana application process.


• अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जावे लागे


कार्यालयात जाऊन स्वाधार योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज कार्यालय जमा करावा लागे


• अशा प्रकारे तुमची स्वाधार योजने अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.ल.ल.ss



Comments

Popular posts from this blog

Crop Protection :- आता मोकाट प्राणी शेतात शिरताच मोबाईलवर येईल एसएमएस

जनावर गाभण न राहण्याच्या समस्येवर घरगुती उपचार

Birsa Munda Krushi Kranti Yojana : बिरसा मुंडा योजनेतून मिळवा विहिरीसाठी अनुदान ; काय आहे योजनेसाठी पात्रता

Nano DAP Fertilizer : शेतीचा उत्पादन खर्च होणार कमी; केंद्र सरकारने नॅनो डीएपी खत केले लाँच.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना :- Annasaheb Patil

दर्जेदार काळी मिरीचे उत्पादन तंत्र (Black paper)

अमेरिकेतील गाईंच्या पोटाला छेद का केले जाते...?

Farmer Accident Insurance Schemes: शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत

कबूतरा मुळे 6 महिन्यात मरणाच्या दारात... उपाय... ?

गोष्ट लालबागच्या राजाची